बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी एसआयटी चौकशी केली जाणार आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना यावर बोलण्याचा हक्क
.
अंजली दमानिया यांनी म्हणाल्या, काल धनंजय मुंडेंना बीड च्या अल्पवयीन मुलीवर भाश्य करताना बघून खूप राग आला. जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत. आशा माणसाला कुठल्याही महिलेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. असे असताना तो मागणी करतो की एसआयटी लावावी आणि मुख्यमंत्री एका दिवसात त्यांचे म्हणणे ऐकून एका महिला आयपीएसची एसआयटी लावतात? का? कुठली आली आहे एवढी मित्रता? बीडच्या त्या अल्पवयीन मुलीला तातडीने न्याय मिळालाच पाहिजे, पण त्यासाठी लढायला चांगली सुसंस्कृत माणस आहेत. आम्ही नेहमी प्रमाणे लढूच. ह्यावर बोलण्याचा हक्क धनंजय मुंडेंना नक्कीच नाही.
धनंजय मुंडे सारख्या माणसाचा विरोध केलाच पाहिजे
अंजली दमानिया या आज दुपारी उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेणार आहे. त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, मला त्यांना हेच सांगायचे आहे की सगळ्या महिला जेवढ्या आमदार आहेत त्यांनी विरोध केला पाहिजे आणि सगळ्यांनी सांगितले पाहिजे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरच्या केसेस संपत नाहीत तोपर्यंत त्यांच्या आशा मागण्या मान्य करण्यात येऊ नये. धनंजय मुंडे सारख्या माणसाचा विरोध केलाच पाहिजे. ही मागणी घेऊन मी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना विधानभवनात जाऊन भेटणार आहे.
खरी कारवाई बबनराव लोणीकरांवर व्हायला पाहिजे होती
अंजली दमानिया यांनी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांच्या निलंबनाबाबत देखील आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, बबनराव लोणीकर यांनी जी भाषा वापरली आणि कोकाटे जे सदैव वापरतात त्याच्या विरुद्ध एक चकार शब्द मुख्यमंत्री बोलत नाहीत. तर नानांचे निलंबन न करता खरी कारवाई जी व्हायला पाहिजे होती ती बबनराव लोणीकर यांच्यावर व्हायला पाहिजे होती, कोकाटे यांच्यावर व्हायला पाहिजे होती. पण, मुख्यमंत्री या संदर्भात बोलत नाहीत, अशी टीका दमानिया यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची ऐशी की तैशी
तसेच महाराष्ट्राचे अर्थव्यवस्थेवर बोलताना म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची ऐशी की तैशी झाली आहे. म्हणजे 9.3 लाख कोटीपर्यंत कर्ज गेले आहे. विरोधी पक्ष सध्या बाकीच्या गोष्टींवर इतका व्यस्त आहे की त्यांना हे महत्त्वाचे प्रश्न विचारायला वेळच नाही किंवा त्यांना ते कळतच नाही.
ठाकरे बंधू एकत्र येणे हा राजकारणाचा भाग
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर अंजली दमानिया म्हणाल्या, मला एवढेच वाटते की यांचा हा लढा आहे तो अस्तित्वाचा लढा आहे, मराठी माणसासाठी नक्कीच नाही. कारण आता महाराष्ट्राच्या विधान भवनात जी माणसे बसलेली आहेत ती सगळी मराठी माणसेच आहेत आणि त्या सगळ्या मराठी माणसाने खरेतर एकत्रपणे महाराष्ट्रासाठी लढायला हवे. पण, डोक्यात भरवले जाते की आमची शिवसेना असो किंवा मनसे असो हीच फक्त मराठी माणसासाठी लढते. हे सगळे असे दाखवणे मला वाटते की हा राजकारणाचा भाग आहे.