शिवसेना ठाकरे गट खामगाव तालुका व शहर यांचे वतीने गांधी चौक येथे हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवून पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात शासन निर्णयाच्या जी आर प्रतीची होळी करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर जगाचा पोशिंदा शेतकरी बळीराजा बद्दल बेताल वक्तव्य करणारा वाचाळवीर भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला चप्पल व जोडे मारून आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, विधानसभा समन्वयक भिकुलाल जैन, संघटक विजय बोदडे, तालुका प्रमुख श्रीराम खेलदार, आरोग्य सेना सुभाष ठाकूर, युवा सेना शहर प्रमुख अक्षय हातेकर, विद्यार्थी सेना शुभम लांडे, महिला आघाडी तालुका प्रमुख श्रुती पतंगे, नंदाताई दुबे, पल्लवी पाटील, उपशहर प्रमुख किशोर लोखंडे, दिनेश पतंगे, विभाग प्रमुख अमोल वावगे, धीरज फाटे, किशोर भुतेकर, विजय चव्हाण, इमरानभाई शाखा प्रमुख, दीपक कांबळे, शुभम बावस्कर यांसह मराठी भाषा प्रेमी, शेतकरी, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.
Source link