खासदार संदिपान भुमरे यांच्या चालकास सालारजंगच्या वंशजांनी तब्बल १५० कोटींची जमीन हिबानामा (गिफ्ट) दिली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत त्यांचे चालक जावेद शेख यांची सोमवारी सकाळी ११ वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. मात्र, त्यांनी चौक
.
दरम्यान, हिबानामा करून देणारे सालारजंगचे मीर मेहमूद हे आजारी असल्याने चौकशीला आले नाहीत. दोन दिवसांत ते येणार असल्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी जावेद यांची आर्थिक गुन्हे शाखेत पोलिस निरीक्षक संभाजी पवार व एपीआय मोहसीन सय्यद यांनी दिवसभर चौकशी केली. जावेद यांचे मीर मेहमूद यांच्याशी कौटुंबिक नाते काय आहे? हिबानामा कोणत्या आधारावर झाला? तुम्हालाच जमीन कशी मिळाली? तक्रारदार यांच्या दाव्यानुसार जमीन त्यांना हिबानामा करून देण्यात आली होती, तर पुन्हा तुमच्या नावे दुसरा हिबानामा कसा केला? यासह अन्य प्रश्न पोलिसांकडून विचारण्यात आले. मात्र, जावेद यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.