महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी आकर्षक योजना जाहीर केली. आता लांब आणि मध्यम पल्ल्याच्या (१५० किमीपेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत मिळणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध
.
एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त १ जून रोजी प्रताप सरनाईक यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. त्यानुसार कमी गर्दीच्या हंगामात लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आणली आहे. ही सवलत पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी (सवलतधारक प्रवासी वगळून) लागू असेल. विशेष म्हणजे, ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. याचा अर्थ, एरवीच्या दिवसांत प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा मिळेल.
ई-शिवनेरी प्रवाशांनाही विशेष फायदा: मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित ई-शिवनेरी बसमधील पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांनाही या योजनेचा सर्वाधिक लाभ घेता येणार आहे.
असे करा संकेतस्थळावर आरक्षण प्रवाशांना या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एसटीच्या तिकीट खिडकीवर, अधिकृत संकेतस्थळ npublic.msrtcors.com वर किंवा MSRTC Bus Reservation या मोबाईल ॲपद्वारे आगाऊ तिकीट आरक्षित करता येईल. त्यामुळे, तुम्ही तुमचा प्रवास १५ टक्के स्वस्त करू शकता.