अचलपूर नगरपालिकेतील 285 कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित: 2 कोटी 60 लाखांचे वेतन थकले, आमदार खोडके विधानसभेत उपस्थित करणार तारांकित प्रश्न – Amravati News



परतवाडा येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांचे वेतन कधीही वेळेवर होत नाही. वेतनातील अनियमिततेबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी नोंदवूनही योग्य असा तोडगा निघाला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून हा मुद्दा

.

अचलपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा गुरुकुल पब्लिक स्कूलचे अध्यक्ष रवींद्र गोळे आणि जिल्हाध्यक्ष अनिल तायडे यांच्या नेतृत्वात एका प्रतिनिधी मंडळाने आमदार संजय खोडके यांची भेट घेतली. मुळात याबाबतचे निवेदन त्यापूर्वीच आमदार सुलभा खोडके यांना देण्यात आले होते. त्यांनी सतत पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने विधानसभा तारांकित प्रश्न क्रमांक ७९४२ नुसार ही वस्तुस्थिती मागवून घेतली आहे. शिवाय हा प्रश्न येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुलभा खोडके यांच्या माध्यमातून गाजणार आहे.

अचलपूर नगर परिषदेत २८५ कर्मचारी कार्यरत असून ४२५ सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांच्या वेतनाचे अनुदान २.६० कोटी रुपये होते. ते वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेले कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्यात येत नाहीत. परिणामी विनाकारण व्याजाचा भुर्दंड कर्मचाऱ्यांना बसतो. तर सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावते. या प्रकरणी वेळेवर अनुदान उपलब्ध करून द्यावे व नगर परिषद कर्मचारी यांचा डिसीपीएसचा मुद्दा निकाली काढावा, तसेच इतर प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.

तसे निवेदन उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविण्यात आले असून बैठक आयोजित करण्यासंदर्भात आमदार संजय खोडके यांना साकडे घालण्यात आले आहे. यावेळी त्यांच्याशी सविस्तर चर्चाही करण्यात आली. यावे‌‌ळी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश खडके, किशोर काळे, सुभाष मोहितीरे, रमेश वाटाणे, संजय बोबडे, बंडू मुळे हे सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24