पवार कुटुंबातील नव्या पिढीच्या वैवाहिक चर्चा आता चांगल्याच रंगल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा एप्रिलमध्ये पार पडला होता. त्यानंतर आता अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हेही विवाहबंधनात अडकण्याच्या तयारी
.
युगेंद्र पवार आणि तनिष्का प्रभू यांचा साखरपुडा अगदी घरगुती आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. दोघांचेही काही निवडक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये तनिष्का या हातातील साखरपुड्याची अंगठी दाखवत आहे.
कोण आहेत तनिष्का प्रभू?
युगेंद्र पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव तनिष्का प्रभू असे आहेत. तनिष्का या परदेशांमध्ये शिक्षणासाठी गेल्या होत्या. तनिष्का यांनी फायनान्समध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे. सुप्रिया सुळे यांनी दोघांच्या साखरपुड्याबद्दलची माहिती सर्वांना दिली.
आजोबांचा सल्ला मनावर घेतला
काही महिन्यांपूर्वी युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्याकडे ” अक्षता टाकायची संधी कधी देताय? ” असा गमतीशीर सवाल केला होता. आजोबांचा तो सल्ला मनावर घेत, युगेंद्र यांनी थेट साखरपुड्याची बातमी दिली.
युगेंद्र पवार कोण आहेत?
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म 22 एप्रिल 1991 रोजी झाला. त्यांनी अमेरिकेतील नॉर्थईस्टर्न विद्यापीठातून फायनान्स आणि इन्शुरन्समध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार म्हणून कार्यरत आहेत. ‘शरयू फाउंडेशन’च्या माध्यमातून बारामती, इंदापूर आणि फलटण तालुक्यांमध्ये त्यांनी वनीकरण, ओढा खोलीकरण आणि विहिरींची उभारणी असे उपक्रम राबवले आहेत. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत.
युगेंद्र पवार 2024 मधील विधानसभा निवडणुकीत राजकीयदृष्ट्या चर्चेत आले. शरद पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवारांना थेट अजित पवारांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. ही लढत पवार कुटुंबातच असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष बारामतीकडे वेधले गेले होते. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. अजित पवार यांनी मोठ्या मताधिक्क्याने युगेंद्र पवार यांना पराभूत केले होते.