भर रस्त्यात पोलिस अधिकाऱ्याची हत्या: कारने उडवल्यानंतर पोटावर आणि छातीवर वार; अमरावतीतील घटनेने खळबळ – Amravati News



अमरावती शहरात एका पोलिस अधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. अब्दुल कलाम अब्दुल कादर असे हत्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आह हल्लेखोरांनी आधी त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, त्यानंतर त्यांच्या पोट आ

.

कलाम हे अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या वलगाव पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. रविवारी ते आपल्या दुचाकीने जात असताना, एका चारचाकी वाहनाने त्यांच्या बाईकला पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर गाडीमधून उतरलेल्या सुमारे पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारदार शस्त्रांनी वार केले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या हल्ल्यात कलाम हे गंभीर जखमी झाले. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत तातडीने नजीकच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांकडून हल्लेखोरांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी भेट दिली. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी दोन विशेष पथके तयार करून शहरभर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फूटेज, स्थानिकांची माहिती आणि वाहनांची तपासणी हे सर्व मार्ग अवलंबून तपास सुरू आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित

पोलिसांवरील हल्ल्यामुळे शहर हे सुरक्षित नसून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तसेच हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही केली जात आहे.

हे ही वाचा

वर्धेत शेतीचा ‘धुऱ्या’वरून 3 जीव गेले:कुऱ्हाडीचे घाव घालून काकू अन् चुलत भावाची हत्या, नंतर आरोपीची विष प्राशन करून आत्महत्या

शेतीच्या धुऱ्याच्या अर्थात बांधाच्या वादावरून 3 जणांचा बळी गेल्याची भयंकर घटना वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात घडली आहे. या प्रकरणात आरोपीने प्रथम आपली काकू व चुलत भावाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून मृत्यूला जवळ केले. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. पूर्ण बातमी वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *