‘सोन्या तू अजून शुद्धीवर आला नाही का?’: संजय राऊत यांना गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर; मराठीचा नाही तर हिंदीचा विषय असल्याची पुस्ती – Jalgaon News



मराठी ही आमची भाषा आहे आणि आम्ही ते मान्य करतो. मात्र, विषय केवळ हिंदीचा आहे. हिंदीच्या बाबतीत सामूहिक निर्णय झाला पाहिजे, अशीच सर्वांची इच्छा आहे. असे परखड मत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. इतकेच नाही तर त

.

राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत. या मोर्चा संदर्भात बोलताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या बंकर मध्ये लपून बसले आहेत? अशी बोचरी टीका केली होती. त्याला मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे हे तुझ्या छाताडावर बसलेले आहेत, सोन्या तू अजून शुद्धीवर आला नाही का? अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

राज आणि उद्धव एकत्र येतील का?

राज आणि उद्धव ठाकरे पुढील काळात एकत्र येतील का? या प्रश्नावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जाला-त्याला स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी देवाने दिली आहे. शेवटी कोणी काय निर्णय घ्यावा? हा त्या पक्षप्रमुखांचा विषय आहे. ते दोन्ही पक्षप्रमुख आहेत. ते जो निर्णय घेतील, तो घेतील, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

निवडणुकीतील जागा वाटप मधील वाद छोटा

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील जागा वाटपावर सुरू असलेल्या वादाला देखील गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजून दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही बोलणी झालेली नाही. त्यामुळे जागा वाटपाबाबत कोणी काही म्हटले असेल तर तो त्याचा त्याचा विषय आहे. याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. जी पॉलिसी ठरेल ते आम्ही ठरवू, जागा वाटपामध्ये अशा गोष्टी होत राहतात, असे देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे आता कुठे लपून बसले आहेत – संजय राऊत

या संदर्भात संजय राऊत म्हणाले होते की, फडणवीस यांचे सरकार काय चर्चा करेल हा त्यांचा प्रश्न आहे. वास्तविक त्यांना या विषयावर काही भूमिकाच नाही. ते दिल्लीचा खुळखुळा वाजवत आहेत. शिवसेना म्हणून घेणारे एकनाथ शिंदे आणि मंडळींचे मला आश्चर्य वाटत आहे. अशावेळी ते कुठे लपून बसले आहेत? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. उदय सामंत कोणती भूमिका मांडतात? असा प्रश्नही त्यांनी विचारला. त्यांनी ठामपणे मराठी माणसाची भूमिका मांडायला हवी. सर्व विरोध झुगारून त्यांनी मराठी भाषा, मराठी अस्मितेवर ठामपणे बोलायला हवे, असे आवाहन देखील संजय राऊत यांनी केले आहे. शिंदे आता कुठे लपून बसले आहेत? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24