कजगाव परिसरात एकाच रात्री चार ठिकाणी चोऱ्या: कजगावसह घुसर्डी, पासर्डी गावात घरफाेडी‎ – Jalgaon News



येथे चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. गुरुवारी रात्री कजगावसह शेजारच्या घुसर्डी,पासर्डी गावात एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.

.

कजगाव येथे २६ रोजी मध्यरात्री नंतर गजबजलेल्या राणा पॉइंट चौकातील सुदर्शन भिला अमृतकर यांच्या घरात चोरट्यांनी चोरी केली. येथून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लांबवली. तेथून तीन किलोमीटर अंतरावरील पासर्डी येथील भारत नगर मधील अर्जुन विठ्ठल पाटील यांचे घर फोडत २० हजार रुपयांची रोकड लंपास केली. तेथुन काही अंतरावरील घुसर्डी येथे बळीराम हरी जाधव व निवृत्ती भास्कर देवकर यांचे घर फोडत येथून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी लांबवला. चार घरफोड्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

चोऱ्यांचे सत्र सुरूच गेल्या दोन महिन्यात कजगाव येथे गजबजलेल्या चौकातून तीन दुचाकी चोरट्यांनी लांबवल्या आहेत. याचा तपास लागत नाही तोच गेल्या आठवड्यात वाडे रस्त्यावरील मोहन लखा अहिरे यांची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. त्यानंतर पुन्हा कजगाव व पासर्डी येथे घरफोडीच्या घटना घडल्या. दरम्यान गुरुवारी रात्री चोरट्यांनी शेतकऱ्यांना लक्ष केल्याचे दिसून येत आहे. मशागतीची मजुरी व खतांसाठी सांभाळून ठेवलेल्या पैशावर चोरट्यांचा डल्ला मारला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24