हिंदी सक्ती थांबवा, मराठी भाषा वाचवा: हिंदी सक्तीविरोधात ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन, क्रांती चौकात जीआरची होळी – Chhatrapati Sambhajinagar News


हिंदी सत्तेची विरोधात एकीकडे शिवसेना आणि मनसे आंदोलन करत असताना छत्रपती संभाजी नगरात उद्धव सेनेच्या वतीने या विरोधात आंदोलन करण्यात आले. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आज क्रांती चौक येथे राज्य शासनाने जो अध्यादेश काढलेला आहे त्या जीआरची होळी करून आंदोल

.

या आंदोलनादरम्यान हिंदी सक्ती नाही चालणार नाही चालणार, राज्य शासन हाय हाय, प्रशासनाचा धिक्कार असो, मुख्यमंत्री हाय हाय, मुख्यमंत्री हाय हाय, अशा घोषणा देण्यात आल्या.

शहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, उपजिल्हाप्रमुख संतोष खेंडके, संतोष जेजुरकर, विजय वाघमारे, उपशहर प्रमुख प्रकाश कमलानी, राजू दानवे,प्रमोद ठेंगडे, दिनेश राजेभोसले, बापू कवळे, अजय चोपडे, बापू पवार,नितीन पवार, अनिल लहाने,विभाग प्रमुख विनोद सोनवणे, देविदास पवार, संतोष बारसे,सिंधू वडमारे, यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

ठाकरे बंधूंच्या आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत. “ना कुठला झेंडा, फक्त मराठीचा अजेंडा” असा नारा देत दोन्ही बंधूंनी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही पहिली ते चौथी हिंदी नको अशी भूमिका घेत या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

हिंदी सक्तीवरून आव्हाडांची सरकारवर टीका

दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी भाजप 24 तास फक्त राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. हिंदी सक्ती गुजरात, तामिळनाडू, बंगाल, ओडिसा या कुठल्याही राज्यात केली नाही परंतु महाराष्ट्रात केली जात आहे. कुठली भाषा शिकायची हा इच्छेचा प्रयत्न आहे. सक्तीचा नाही, असेही ते म्हणालेत. मला फ्रेंच शिकायचे असेल ते शिकेन, जर्मन शिकेन पण तुम्ही सक्ती का करता? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24