‘हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ‘ या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘ज्ञानोबा- माऊली तुकाराम’….रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी… अशा जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या
.
यावेळी इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, इंदापूरचे सचिन खुडे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासनातर्फे वारकऱ्यांसाठी सुविधा
इंदापूर तालुक्यात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम सणसर, निमगाव केतकी, इंदापूर शहर आणि सराटी या ठिकाणी आहे. आषाढी वारीकरिता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तालुका प्रशासन, इंदापूर नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पंचायत समिती, पोलीस विभाग, आरोग्य विभागाच्या वतीने तयारी केली आहे.
जर्मन हँगर पद्धतीचे मंडप, शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, फिरते वैद्यकीय पथके, मोफत औषधोपचार, चरण सेवा, हिरकणी कक्ष, निवारा केंद्र, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, फिरते सुलभ शौचालय, कचरा वाहतूक घंटागाडी, कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक आदी व्यवस्था करण्यात आली असून ध्वनिक्षेपकाद्वारे सूचनाही देण्यात येत आहेत.
हे ही वाचा…
काटेवाडीत संत तुकारामांची पालखी दाखल:धोतराच्या पायघड्यांनी पालखीचे स्वागत, डोळ्यांचे पारणे फेडणारा मेंढ्यांचा रिंगण सोहळा
संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा साताऱ्यातून बारामतीतील काटेवाडीमध्ये शुक्रवारी पोहोचला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा एक अनोखा आणि लक्षवेधी क्षण काटेवाडीत अनुभवायला मिळाला. तुकोबांच्या पालखीच्या स्वागतासाठी काटेवाडी ग्रामस्थांकडून धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या. त्यानंतर डोळ्यांचे पारणे फेडणारा मेंढ्यांचा रिंगण सोहळा पार पडला. पूर्ण बातमी वाचा…
अश्वांची नेत्रदीपक दौड अन् हरिनामाचा गजर:तरडगावात माऊलींचे पहिले उभे रिंगण उत्साहात, भाविकांनी कपाळाला लावली माती
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता सातारा जिल्ह्यातील लोणंद–तरडगाव दरम्यानच्या चांदोबाचा लिंब या पारंपरिक ठिकाणी मोठ्या भक्तिभावात पार पडले. चोपदारांनी आकाशाकडे चोप दाखवताच संपूर्ण वारीत क्षणात शांतता पसरली आणि अश्वांच्या नेत्रदीपक दौडीला सुरुवात झाली. टाळ, मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात वातावरण भारावून गेले. पूर्ण बातमी वाचा…