आणीबाणीच्या 50 व्या वर्षानिमित्त पुण्यात विशेष प्रदर्शन: जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन; बंदिवास सोसलेल्या ज्येष्ठांचा सन्मान – Pune News



देशात 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती, या घटनेला आज 50 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय तळमजला येथे आयोजित विशेष प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते उद्घाटन करण्

.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, तहसीलदार श्वेता पवार, माहिती अधिकारी सचिन गाढवे आदी उपस्थित होते.

यावेळी आणीबाणी कालावधीत बंदिवास सोसलेल्या व्यक्तींना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या ज्येष्ठ व्यक्तींनी दिलेल्या ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमला.

या प्रदर्शनास भारताच्या प्राचीन कालखंडापासून टप्प्या- टप्प्याने विकसित झालेली लोकशाही परंपरा, स्वतंत्र्योत्तर भारत आणि संसदीय प्रणाली, आणीबाणीपूर्व आणि आणीबाणी कालावधीत घडलेल्या घडामोडी आदी माहितीचे प्रदर्शनात सादरीकरण करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे संयोजन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. हे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालय तळ मजला, ए विंग येथे 25 जुलै 2025 पर्यंत पाहण्यासाठी उपलब्ध आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

श्री संत सोपानकाका पालखी सोहळा निमित्ताने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

श्री संत सोपानकाका पालखी सोहळा निमित्ताने बारामती तालुक्यात २७ जूनपर्यत वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहेत.बारामती तालुक्यातील निरा-बारामती रोडवरुन होणारी वाहतूक २६ जून २०२५ रोजी निरा कार्नर निंबुत वरुन मोरगाव रोडने चौधरवाडी फाट्यावरुन चौधरवाडीमार्गे करंजेपूल तसेच २७ जून रोजी निरा-बारामती रोडने होणारी वाहतूक ही कटींगपुल, बजरंगवाडी, को-हाळे खुर्द मार्गे होळ, वाणेवाडी, करंजेपूलमार्गे निरा यापर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याबाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *