पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाने बदलावे, अशी मागणी केल्यानंतर, याला विरोध करत उबाठाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात ठिक
.
उबाठाचे उपविभाग प्रमुख गिरीश गायकवाड यांनी हे बॅनर लावले असून, त्यामध्ये “कोथरुडच्या बाई, जर तुम्हाला नामांतराची एवढी खुमखुमी असेल, तर बुधवार पेठेचे नाव ‘मस्तानी पेठ’ करा,” असा उपरोधिक सवाल विचारण्यात आला आहे.
नेमके बॅनरवर काय लिहलंय?
उबाठाचे उपविभाग प्रमुख गिरीश गायकवाड यांनी लावलेल्या बॅनरवर म्हटलंय की, कोथरुडच्या बाई आपणांस नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेढेचे नाव मस्तानी पेठ करावे. यासह मेधा कुलकर्णी यांचा मस्तानीच्या वेशभुषेतील फोटो लावण्यात आला आहे.

मेधा कुलकर्णींची मागणी काय? खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, पुणे हे देशातील शैक्षणिक व आयटी क्षेत्रातील महत्त्वाचे शहर आहे. इतके महत्त्व असूनही, पुणे रेल्वे स्थानकाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. राजधानी एक्सप्रेस व अन्य महत्त्वाच्या गाड्यांचे पुण्याशी थेट जोडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, स्थानकाचे नाव थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाने ठेवावे, कारण त्यांनी अनेक युद्धे लढली आणि कधीही पराभव पत्करला नाही.
कुलकर्णींनी इतिहासाचा अभ्यास करावा या मागणीवर प्रतिक्रिया देताना श्रीमंत कोकाटे म्हणाले की, पुण्याची स्थापना राजमाता जिजाऊ यांनी केली आहे. त्यामुळे स्थानकाचे नामकरण करताना त्यांचा विचार व्हावा. पुण्याची मूळ रचना राजमाता जिजाऊंमुळेच शक्य झाली. मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव घेण्याची केलेली मागणी अत्यंत चुकीची आणि निराधार आहे. दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले की, पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव देण्यात यावे.