नाशिकमधील खळबळजनक घटना: पोलिस शिपायाने 6 वर्षांच्या मुलीला गळफास लावला, स्वतःही केली आत्महत्या – Nashik News



नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून, पोलिस शिपायाने स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलीला गळफास लावून ठार मारल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना नाशिक रोड परिसरात घडली. पोलिस शिपायाचं नाव स्वप्नील गायकवाड असून, त्याच्या

.

स्वप्नील गायकवाड नाशिक शहर पोलिस दलात कार्यरत होता. काही काळापूर्वी त्याचा पत्नीशी घटस्फोट झाला होता आणि त्यानंतर तो मानसिक तणावात होता. याच तणावातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी घटस्फोटीत पत्नीची सविस्तर माहिती घेण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.

तरुणाच्या पत्नीचे अश्लील कृत्य करतानाचे व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे हरियाणातील रोहतक येथे राहणाऱ्या एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या तरुणाच्या पत्नीचे संबंध संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासोबत विवाहबाह्य स्वरूपाचे होते. त्यांनी एकमेकांसोबत अश्लील कृत्य करतानाचे आणि डान्सचे व्हिडिओ तयार केले होते. हे व्हिडिओ संबंधित महिलेने तिच्या पतीला पाठवले. या प्रकारानंतर मानसिक तणावाखाली आलेल्या पतीने तीन दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी तरुणाने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, ज्यात त्याने स्पष्ट आरोप केला की त्याची पत्नी दिव्या आणि तिचा प्रियकर, जो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे, हे दोघे मिळून त्याला सातत्याने मानसिक छळ करत होते. दिव्या त्याच्यावर वडिलांना मारण्यासाठी आणि वडिलोपार्जित जमीन विकण्यासाठी दबाव टाकत होती.

तसेच, पोलिस बॉयफ्रेंडला बढतीसाठी पैशांची गरज होती आणि त्यासाठी पत्नी दिव्या पतीला ब्लॅकमेल करत होती, असेही त्या व्हिडिओमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मृत तरुणाने आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये केली होती.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित संशयित पोलीस कर्मचारी दोन दिवसांपूर्वी पंधरा दिवसांची रजा टाकून बेपत्ता झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24