एका सराफ व्यावसायिकाकडून दोन जणांनी २७ लाख ६२ हजार रुपयांचे शुध्द सोने दागिने घडवण्यासाठी विश्वासाने घेतले. परंतु ज्वेलर्स मालकाला शुध्द सोने परत न करता सदर शुध्द सोन्याचे दागिने घेऊन तीन जणांनी मिळून फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फर
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी विकास इंगळे (रा. तापकीर गल्ली,पुणे) राजराम रघुनाथ मोरे (वय- ३७) व मनोज रघुनाथ मोरे (दोघे रा. चिखली,पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अमर माझी हे मागील ३० वर्षापासून बुधवार पेठ येथील दुकानात सोन्याचे दागिने बनवून विक्री करण्याचा व्यवसाय करतात. विविध ग्राहकांचे मागणीनुसार ऑर्डरनुसार दागिने बनवून ते देतात. १६ जुलै २०२४ रोजी तक्रारदार यांना त्यांच्या आेळखी मधील कारागीर विकास इंगळे हे त्यांचे दोन जावई राजाराम मोरे व मनोज मोरे यांना घेऊन दुकानात आले होते. त्यांनी सदर दोघांची भेट दुकानदार यांच्याशी करुन दिली होती. जावयांचे चिखली मध्ये पूजा वेल्स नावाने दागिने विक्रीचे दुकान आहे. त्यांच्याकडे तीन किलोपेक्षा अधिक सोने साठलेले असून त्यांना अमर माझी यांच्याकडून दागिने बनवून घ्यायचे आहे असे सांगण्यात आले. तसेच आणखी मोठया ऑर्डर द्यावयाचे आहे असे सांगितले.
राजाराम मोरे व मनोज मोरे यांनी तक्रारदार यांन वेगवेगळया डिझाइन मध्ये सोन्याचे दागिने बनविण्याची ऑर्डर देतेवेळी माझी यांचेकडून ६७६ ग्रॅम १५० मिलिग्रॅम फाइन शुध्द सोने घेतले. ऑर्डर दिल्यावर माझी यांनी हिशोब केला असता एकूण ११३३ ग्रॅम ३३० मिली सोन्याचे दागिने होत असल्याने व त्यात तक्रारदार यांचे मजुरीसह आरोपींकडून एकूण ४०६ ग्रॅम १८० मिलिग्रॅम फाईन सोने याने असल्याबाबत सांगितले. आरोपीने तक्रारदार यांचेकडे भांडवलातील व कामाचे उरत असलेले शुध्द सोने थोडया दिवसात परत करतो असे सांगितले. परंतु २७ लाख ६२ हजार रुपये किंमतीचे सोने किंवा रक्कम परत न करता सदर सोन्याचा स्वत:चे फायद्यासाठी संगनमताने वापर करुन अपहार करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस शिंदे करत आहे.