नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात अदानींची 573330000000 रुपयांची रेकॉर्डब्रेक गुंतवणूक; भारतातील सर्वात मोठा प्रकल्प


Navi Mumbai International Airport News: भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ आपल्या महाराष्ट्रात उभारले जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे (Navi Mumbai International Airport – NMIA)  भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे मोठे विमानतळ ठरणार आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात अदानी ग्रुपने  573330000000 रुपयांची रेकॉर्डब्रेक गुंतवणूक केली आहे. नवी मुंबई विमानतळ हा भारतातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. 

2023 पर्यंत अदानी समूह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात  57,333 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. विमानतळ संकुलात दोन नवीन प्रवासी टर्मिनल, दोन धावपट्टी, एक मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट हब, एक कार्गो टर्मिनल आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी उभारली जाणार आहे. ही गुंतवणूक विमानतळ प्रकल्पाच्या पाचपैकी तीन टप्प्यांमध्ये केली जामार आहे.
20 जून रोजी जारी केलेल्या आदेशात, विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने (AERA) विमानतळासाठी अ‍ॅड-हॉक टॅरिफ आकारण्याबाबत चर्चा केली होती. विमानतळावरून निघणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांकडून 620 रुपये आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून 1,225 रुपये अंतरिम वापरकर्ता विकास शुल्क (UDF) वसूल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विमानतळावर उतरणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांकडून 270 रुपये आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून 525 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

विमानतळाचा व्यावसायिक वापर सुरू झाल्यापासून हे शुल्क आकारले जाईल असे एईआरएने म्हटले आहे. या वर्षी ऑगस्टपासून विमानतळ प्र्त्यक्षात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. अदानी समूहाची नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायव्हेट लिमिटेड (एन-एमआयएएल) विमानतळ प्रकल्पाचे बांधकाम आणि व्यवस्थापन करत आहे.
AERA ने म्हटले आहे की नियमित दर निश्चित करण्यासाठी नियामक चौकट आणि भागधारकांशी सविस्तर सल्लामसलत आवश्यक आहे,  प्राधिकरणाने देशांतर्गत उड्डाणांसाठी प्रति टन  1,400 रुपये आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी प्रति टन 1,850 रुपये विमान लँडिंग शुल्क देखील मंजूर केले आहे.

विमानतळ विकासाच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये 22,531 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. जी विमानतळाच्या दक्षिणेकडील भागावर केंद्रित आहे. ज्यामुळे दरवर्षी 20 दशलक्ष प्रवासी आणि 5 लाख टन मालवाहतूक करण्याची क्षमता निर्माण होईल. यात 3,700 मीटर लांबीचा दक्षिणेकडील धावपट्टी, पूर्ण लांबीचा दुहेरी टॅक्सीवे, टर्मिनल 1, 29 संपर्क स्टँडसह एक एप्रन आणि एकात्मिक कार्गो आणि सामान्य विमान वाहतूक टर्मिनल यांचा समावेश आहे.

टर्मिनल 1 ही विमानतळाच्या मध्यभागी असलेली एक बहुस्तरीय रचना असेल, ज्यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मोठी कार पार्किंग सुविधा देखील असेल. याशिवाय, या टप्प्यात अंतरिम हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) आणि अग्निशमन दल देखील बांधले जात आहे. विमानतळाच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही सीमेवरून प्रवेश देण्यासाठी नवीन रस्ते देखील बांधले जात आहेत.

सन 2026 मध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात विमानतळाची क्षमता 50 दशलक्ष प्रवासी आणि दरवर्षी 1.2 दशलक्ष टन मालवाहतूक करण्याचे उद्दिष्ट आहे. याव्यतिरिक्त, सध्याचे बांधकाम विमानतळाच्या उत्तरेकडील भागात पोहोचेल, जिथे दुसरी धावपट्टी, टर्मिनल 2 आणि विस्तारित कार्गो, एमआरओ (देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल) आणि सामान्य विमान वाहतूक सुविधा उभारल्या जाणार आहेत. नवी मुंबई विमानतळाचे टर्मिनल 2 हे सर्वात मोठे टर्मिनल असेल, ज्यामध्ये चार खांब, 3,500  कारसाठी भूमिगत पार्किंग आणि कोड एफ विमानांसाठी प्रवेशद्वार (A380 सारखे सर्वात मोठे वाइड-बॉडी विमान) असतील. या टप्प्यात 104 मीटर उंचीचा हवाई वाहतूक नियंत्रक देखील बांधला जाईल.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24