सरळ सेवा भरतीसाठी आता किमान ‘पर्सेंटाईल’ पद्धती लागू: MPSC चा ऐतिहासिक निर्णय; पर्सेंटाईल म्हणजे काय? जाणून घ्या – Maharashtra News



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) शासकीय नोकरीसाठी सरळसेवा भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे. यापुढे सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी स्पर्धा परीक्षांप्रमाणेच ‘किमान पर्सेंटाइल अर्हता’ लागू करण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक

.

आतापर्यंत, शासकीय नोकरीतील काही पदे केवळ स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून भरतानाच पर्सेंटाइलचा निकष लावला जात होता. यामुळे निवड प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी उमेदवारांना ठराविक पर्सेंटाइल गुण मिळवणे बंधनकारक नव्हते. परंतु, नवीन निर्णयानुसार, सरळ सेवा भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी निश्चित केलेले किमान पर्सेंटाइल गुण मिळवणे आवश्यक असणार आहे.

MPSC राज्यसेवा, पोलिस उपनिरीक्षक अशा विविध परीक्षांसह ग्रुप ‘क’ सारख्या सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवते. आयोगाच्या नियम क्रमांक 8 (vi) मधील 13 जानेवारी 2021 रोजीच्या सुधारणेनुसार, आता सरळ सेवा भरतीसाठी होणाऱ्या चाळणी परीक्षांनाही किमान पर्सेंटाइल लागू होईल. हा निर्णय आयोगाकडून भविष्यात घेण्यात येणाऱ्या सर्व चाळणी परीक्षांना लागू असणार आहे.

पर्सेंटाइल (शतमांश) अर्हतामान म्हणजे काय?

पर्सेंटाइल हे उमेदवाराच्या कामगिरीचे सापेक्ष मापन आहे, जे परिक्षेतील इतर उमेदवारांच्या तुलनेत किती चांगली कामगिरी केली हे दर्शवते. सोप्या भाषेत सांगायचे तर, पर्सेंटाइल प्रणाली उमेदवाराच्या गुणांची तुलना इतर सर्व उमेदवारांच्या गुणांशी करते. उदाहरणार्थ, 90 पर्सेंटाइल म्हणजे उमेदवाराने 90% उमेदवारांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. MPSC मध्ये, सरळ सेवा भरतीसाठी उमेदवारांना ठराविक किमान पर्सेंटाइल गुण मिळवणे आवश्यक आहे, ज्यामुळे केवळ उच्च गुणवत्तेचे उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतात.

यापूर्वी केवळ राज्य सेवेच्या स्पर्धा परिक्षेत होणाऱ्या भरतीसाठी पर्सेटालचे गुण ग्राह्य धरले जात होते. या पद्धतीमुळे स्पर्धा परीक्षेतून योग्य उमेदवाराची नियुक्ती होत होती. पर्सेंटाइल चा एक निकष म्हणून केला जातो, जिथे निवड होणाऱ्या पदासाठी जास्त पर्सेंटाइल असलेले उमेदवार निवडले जातात.

एमपीएससीमध्ये पर्सेंटाइलचा वापर

एमपीएससी परीक्षेत, प्राथमिक आणि मुख्य परीक्षेचे गुण सामान्य करण्यासाठी पर्सेंटाइलचा वापर केला जातो, विशेषतः जेव्हा परीक्षा अनेक शिफ्टमध्ये घेतली जाते. यामुळे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना योग्य वागणूक मिळते याची खात्री होते.

उदाहरणाने समजून घ्या

एखाद्या परीक्षेत एकूण 1000 उमेदवार असतील आणि एका उमेदवाराला 80 % गुण मिळाले. जर 700 उमेदवारांनी त्या उमेदवारापेक्षा कमी गुण मिळवले असतील, तर त्या उमेदवाराचे पर्सेंटाइल 70 (7000/1000 *100 = 70%) असेल. याचा अर्थ, त्या उमेदवाराने 70 टक्के उमेदवारांपेक्षा चांगली कामगिरी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24