विदर्भातून एका कार्यक्रमासाठी आलेल्या मैत्रिणीसोबत अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग करणााऱ्या तरुणा विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी ता. २२ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला अाहे. पोलिसांनी त्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका ठिकाणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी विदर्भातील एक तरुणी तिचा मित्र राजेश उंटवाल याच्या सोबत आली होती. रात्री सात वाजता सदर कार्यक्रम सुरु झाला होता. या कार्यक्रमाच्या वेळी राजेश याने तिच्या मैत्रिणीसोबत अश्लिल चाळे सुुरु केले होते. यावेळी त्याच्या मैत्रिणीने त्याला विरोध केला असतांना तिला जिवे मारण्याची धमकी दिली.
या शिवाय मैत्रिणीकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने त्याला विरोध केला असता धक्काबुक्की करून ढकलून दिले. यामुळे त्याच्या मैत्रिणीने थेट हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केले. यामध्ये राजेश सोबत ती रिलेशनशिपमध्ये राहात अाहे. एका नृत्य कार्यक्रमासाठी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर भर कार्यक्रमात राजेश याने अश्लिल चाळे करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद केले आहे.
यावरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी राजेश उंटवाल (रा. पुसद) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, जमादार बाळासाहेब खोडवे, जमादार शंकर गायकवाड यांच्या पथकाने तातडीने राजेश यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जमादार खोडवे पुढील तपास करीत आहेत.