Nitin Gadkari News : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या एका विधानाने सध्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे. मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या कारकीर्दीबाबत त्यांनी पहिल्यांदाच फिल्मी स्टाईल विधान केले आहे. अभी तक जो हुआ है, वो न्यूज रील थी’,असली फिल्म शुरू होना बाकी है’ असं त्यांनी म्हंटलय. त्यांच्या या सूचक वक्तव्याचे सध्या पडसाद उमटत आहेत.
नितीन गडकरी रस्त्याची कामं, महामार्गाची कामं, वाहतुकीबाबतचे महत्वाचे निर्णय यामुळे सतत चर्चेत असतात. आता गडकरी आपल्या एका विधानाने चर्चेत आलेत. नागपुरातल्या एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांना 2029 मधल्या संभाव्य भूमिकेबद्दल विचारले असता. त्यांनी फिल्म शुरू होना बाकी है असं उत्तर दिलं. 11 वर्षात जे काही पाहायला मिळालं. ते एक न्यूज रिल होतं..खरी फिल्म अजून सूरू व्हायची आहे, असं म्हणाले. सोबतच पक्ष जबाबदारी देईल ते स्वीकारणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पण आता शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काम करायची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली
गडकरींच्या या विधानावर अनेकांनी प्रतिक्रीया दिल्यात…गडकरी यांचे काम अतिशय चांगले आहे. ओ पिक्चर अभी जल्दी सुरू करे ,29 के लिये क्या फायदा अस जयंत पाटील म्हणाले. तर गडकरींनी जे म्हंटल ते योग्यच आहे. 11 वर्षांत जी काम झाली ती पाहता येणाऱ्या 4 वर्षांत बघा काय काय होतं अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातले बडे नेते. गडकरींच्या कामाचा सपाटा, महामार्गाची कामं याचं नेहमी कौतुक केलं जात. त्यात आता त्यांनी पिक्चर अभी बाकी है म्हणत येत्या काळातील संभाव्य कामांची चुणूक दाखवली आहे. आता येत्या काळात गडकरी काय पिक्चर दाखवतील याकडे लक्ष असेल.