‘ज्ञानोबा-तुकाराम’ नामघोषात दिवे घाट दुमदुमला: माऊलींच्या पालखीचे दिवे घाटातील नयनरम्य दृश्य; पाहा Photo, Video – Pune News


दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालख्या रविवार, 22 जून रोजी पुण्याहून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. दोन्ही पालख्या पुण्यात दाखल झाल्यानंतर शहरात वैष्णवांचा मेळा जमला होता. पुणे आणि आसपासच्य

.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुण्यातील विठोबा मंदिरातून सकाळी 6 वाजता मार्गस्थ झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटात आल्यानंतर नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले.

संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा टाळ-मृदंगाच्या गजरात रविवारी दिवे घाटात पोहोचला. ज्ञानोबा तुकारामांच्या नामघोषात संपूर्ण दिवे घाट मार्ग दुमदुमून गेला होता. चढ-उतारांनी भरलेला, नागमोडी वळणांचा आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला दिवे घाट हा माऊलींच्या वारीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

दिवे घाटातील वारीचे नयनरम्य दृश्य अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक घाटाच्या टेकड्यांवर गर्दी करतात. मात्र यंदा, घाट परिसरात सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे टेकडी परिसरात नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

उंच डोंगर आणि हिरवीगार झाडी यांच्या सान्निध्यातून शेकडो वर्षांची परंपरा जपणाऱ्या या सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पुढे सरकत होते.

वारीचे नयनरम्य दृश्य फोटोंमधून

वारीच्या विहंगम दृष्याचे व्हिडिओ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24