हातावर मेहंदी, गाली हळद… पुण्यातील समलैंगिक लग्नाचा व्हिडीओ पाहिलात?


लग्न म्हणजे दोन व्यक्ती एकत्र येणं. दोन व्यक्ती एकजीव होणं. असाच एक विवाह सोहळा पुण्यात संपन्न झाला. या सोहळ्यातही मेहंदी, हळद, माणसांची लगबग अन् विवाह सोहळा. पण हा सोहळा खास होतो. कारण समलैंगिक श्याम आणि राम यांच्या सोहळ्याची ही कहाणी…

महाराष्ट्रातील पुणे शहरात दोन मुलांनी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या लग्नाची कहाणी खूप खास आहे. कारण ते एक समलिंगी जोडपे आहेत. त्यांनी समाजाला एक नवीन विचार दिला आहे.  श्रीराम श्रीधर आणि श्याम कोन्नूर यांचे लग्न झाले आहे. त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. राम आणि श्याम यांनी पारंपारिक पद्धतीने लग्न केले. हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला आहे. 

श्रीराम श्रीधर आणि श्याम कोन्नूर यांनी पुण्यात लग्न केले आणि त्यांच्या प्रेमाची एक अनोखी आणि प्रेरणादायी कहाणी रचली. सध्या त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत पारंपारिक धोती-कुर्ता, फुलांच्या माळा आणि मंगलाष्टकांच्या पार्श्वभूमीने भरलेले क्षण सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

(हे पण वाचा – प्रेमाला ना बंधन, ना भीती…पुण्यात पार पडला पहिला विवाह समलैंगिक सोहळा)

विवाह सोहळा केवळ दोन व्यक्तींमधील प्रेमाचा उत्सव नव्हता. तर तो समलिंगी समुदायासाठी प्रेरणादायी ठरला आहे. नेटिझन्सनी त्यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये दोघेही पारंपारिक पांढऱ्या आणि सोनेरी बॉर्डरच्या धोती-कुर्ता लूकमध्ये दिसत आहेत. दोघांनी मराठी परंपरा आणि आधुनिक सौंदर्याचा सुंदर मेळ घातला होता.

दोन्ही जोडप्यांचे हे लग्न समलिंगी समुदायासाठी एक मोठी प्रेरणा देखील बनले आहे. या धाडसी निर्णयामुळे समाजातील अनेकांना एक नवीन दृष्टीकोन आणि स्वीकृतीचा संदेश मिळाला आहे. नेटिझन्सनी त्यांच्या प्रेमाचे आणि धाडसाचे मनापासून कौतुक केले आहे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24