शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या घरी अघोरी पूजा सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या
.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान केले. मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी माऊली पालखी सोहळ्यातील विश्वस्त वादावर शासनाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, सरकार या मुद्द्यावर योग्य तो निर्णय घेईल आणि सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. तसेच, आगामी पावसाळी अधिवेशनासंदर्भातही त्यांनी माहिती दिली. अधिवेशनात राज्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होईल आणि शासन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार म्हणाले, मी आज मतदान संपल्यानंतर मुंबईला किंवा जिथे जायचे आहे तिथे जाईल. सोमवार, मंगळवार, बुधवार हे तीन दिवस ते मुंबईत असतील. 30 जून रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी त्यांच्या उद्यापासून बैठका सुरू होणार आहेत. वित्त विभाग म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहे.
अजित पवार म्हणाले की, शासन आपली भूमिका बजावत असते. ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे आणि आम्ही केवळ यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. शासनाचे वेगवेगळे विभाग यात आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतात. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि इतर प्रमुख व्यक्तींसोबत महत्त्वाची बैठक झाली असून, सरकारी यंत्रणांनी आपले काम चोख बजावले आहे. 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये देण्यात आले आहेत. तसेच विविध ग्रामपंचायतींना खर्च करण्यासाठी अनुदान दिले आहे. पुणे महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने, त्यांनी आपले काम करावे आणि सरकार आपले काम करत राहील.
यावेळी अजित पवार यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीबद्दल विचारण्यात आले असता, त्यांनी नो कॉमेंट्स असे म्हणत प्रतिक्रिया देण्याचे टाळले. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून यावर निर्णय घेतील. मंत्री भरत गोगावले यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता, अजित पवारांनी त्या प्रश्नाला उत्तर देणे टाळले. यानंतर मी तुम्हाला बोलत नाही, असे म्हणत काढता पाय घेतल्याचे दिसले.