ज्येष्ठांची जगण्यासाठी झुंज: साहेब जगण्यासाठी पैसे द्या; प्रशासन म्हणते जरा धीर धरा, जिल्ह्यातील 36 हजार निराधारांचे अनुदान थकले‎ – Amravati News



जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत एकूण २ लाख ६६ हजार २६२ लाभार्थी आहेत. यातील ३२ हजार लाभार्थी विविध कारणांनी कोणतेही कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून या लाभार्थ्या

.

जिल्ह्यातील ३२ हजारांवर निराधारांची हिच स्थिती आहे. त्यांची जगण्यासाठी झुंज आणि धडपड सुरू आहे. कागदपत्रे अपलोड करणे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याची किचकट प्रक्रिया त्यांच्याकडून सहज होत नसल्यामुळे तसेच प्रशासनाकडून त्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने निराधारांची अवहेलना थांबताना दिसत नाही.

आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात निराधारांना औषधोपचार व इतर खर्चासाठी शासनाकडून १ हजार ५०० रुपये मासिक अनुदान दिले जाते. या अनुदानातून निराधारांचे जगणे सुसह्य व्हावे, हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे शासनाकडून निराधार नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. निराधार व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असल्याने शासनाच्या योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांना आर्थिक मदतही करणे आवश्यक आहे. जेणेकरून या अनुदानातून किमान त्यांना आवश्यक औषधोपचार घेता यावेत. निराधारांना अनुदान देण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आदी योजना राबवल्या {उर्वरित. पान ३ ^संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे लाभ देण्यात येत आहे. मात्र, आधार प्रमाणीकरण झालेले नसल्याने पेमेंट फेल होत आहे. त्यामुळे लाभ देण्यात अडचण येत आहे. जिल्ह्यातील ३२ हजारांवर लाभार्थ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण केलेल्या अन्य लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निराधार लाभार्थ्यांनी त्रुटी तातडीने पूर्ण करून सहकार्य करावे. -आशिष येरेकर, जिल्हाधिकारी.

अनुदान न मिळण्याची प्रमुख कारणे अशी डीबीटी पोर्टलवर पेमेंट अयशस्वी होण्यामध्ये मुख्य कारण आधार कार्ड बँक खाते क्रमांकाशी आणि एनसीपीआयशी लिंक नसणे, आधार क्रमांक मॅप नसणे, आधार आयआयएनशी मॅप नसणे, लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खाते क्रमांक बरोबर लिंक नसणे यामुळे पेमेंट अयशस्वी होत आहे.

लाभार्थ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करावे

ऑनलाइन प्रक्रिया कशी करावी समजत नाही ^सुरुवातीला बरोबर अनुदान जमा व्हायचे, मात्र आता नवीन ऑनलाइन प्रक्रिया करण्यास सांगत आहे. कोणीही कागदपत्रे सादर करण्यासाठी घेऊन जायला तयार नाही, कोणी मदत करत नाही. नातेवाईक सोबत येण्यास टाळाटाळ करतात. -गीता तुरणके, महिला लाभार्थी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *