विवाह संकेतस्थळावरून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक: महिलेने वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली ११.४५ लाख रुपये उकळले – Pune News



विवाहा करण्याच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी ११ लाख ४५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

.

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८५ वर्षीय तक्रारदार बिबवेवाडी भागात राहायला असून, ते निवृत्त आहेत. काही वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाल्यामुळे ते एकटेच राहतात. त्यांना पुनर्विवाह करायचा होता. त्यांनी १८ एप्रिल रोजी एका विवाहविषयक संकेतस्थळाची माहिती घेतली होती. त्या संकेतस्थळाशी त्यांनी संपर्क साधला. त्या वेळी संबंधित महिलेने विवाहनोंदणीसाठी १५०० रुपये शुल्क भरावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर ज्येष्ठाने १५०० रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा केले. तेव्हा त्या महिलेने आणखी एका महिलेचा मोबाइल क्रमांक दिला. ज्येष्ठ नागरिकाने त्या महिलेशी संपर्क साधला. तिने विवाहाच्या आमिषाने जाळ्यात ओढले.

त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. मावसबहीण आजारी असून, कोल्हापूर येथे आल्याचे तिने त्यांना सांगितले. त्यानंतर तिने अपघात झाल्याची बतावणी केली. वैद्यकीय उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगितले. पुण्यात आल्यानंतर पैसे परत करते, असे सांगून तिने ज्येष्ठाकडे पैसे मागितले. ज्येष्ठाने तिच्या बँक खात्यात वेळोवेळी ११ लाख ४५ हजार रुपये जमा केले. पुण्यात आल्यानंतर पैसे परत करीन असे सांगत तिने वेगवेगळे बहाणे करून पुन्हा पैशांची मागणी सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर संबंधित गुन्हा तपासासाठी बिबवेवाडी पोलिसांकडे सोपविण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24