राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच राजकारणात व्यस्त असलेले आपण पाहतो. परंतु मुंबईतील पाच प्रसिद्ध रेडियो जॉकींनी त्यांची एका कार्यक्रमात मुलाखत घेतली आणि विशेष म्हणजे यात कुठलाही राजकीय मुद्दा नव्हता. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी त्य
.
आपल्या मॉडेलिंगबद्दल देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, माझ्या मित्रांनी माझ्यासोबत प्रँक केला होता. सुदैवाने तो चालला त्यामुळे मी वाचलो. मात्र, बरे झाले मी त्यातून बाहेर पडलो. कुत्रा मनुष्याला चावला तर बातमी होत नाही. पण मनुष्य कुत्र्याला चावला तर बातमी होते, माझे मॉडेलिंग म्हणजे ती झालेली माझी बातमी होती, असे मजेशीर उत्तर फडणवीस यांनी दिले.
हिंदी सिनेमातील आवडत्या गाण्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अजय देवगण आणि तब्बू यांच्या सिनेमातील गाण्याच्या ओळी म्हटल्या. तसेच मला लिहिण्याची आवड आहे, पण मी कधी पब्लिकमध्ये लिहिले नाही. मी रामावर गाणे लिहिले आहे, शंकरावर लिहिले आहे, अजून एक गाणे लिहिले आहे, ते तुम्ही शोधले तर सापडेल. मी सांगणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
मी आठवले घराण्याचा कवी
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी आठवले घराण्याचा कवी आहे. तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे.. अशी रामदास आठवले स्टाइलमध्ये त्यांनी काही ओळी यमक जुळवत म्हणून दाखवल्या. गाण्यांविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गाणी आपल्यातील संवेदना जीवंत ठेवतात, आम्ही बाहेरून खडूस दिसतो पण आतून चांगले आहोत. आम्ही सर्व राजकीय व्यक्ती दररोज 10 रील्स बनवतो, त्यामुळे म्युजिक आम्हाला प्रमोट करते, असे त्यांनी सांगितले.
आम्ही कोरसवाले माणसं
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गाणी खूप लक्षात राहतात, पण मी सुरात गात नाही. त्यामुळे मी मोठ्याने गाणी लावतो आणि त्यात गातो. ज्यामुळे सूर चुकले तर कळत नाही. आम्ही कोरसवाले माणसं आहोत. तसेच मला अमृतावर प्रेशर टाकून तिला म्हणावे लागेल की माझे गाणे म्हण, मी एक गाणे लिहिले आहे जे अमृताने गायले आहे, ते तुम्ही शोधा, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
राहों में उनसे मुलाकात हो गई.. हे माझ्या आवडीचे गाणे
आम्ही लव्ह मॅरेजवाले नाही. मला 90 च्या दशकातील गाणी आवडतात. राहों में उनसे मुलाकात हो गई.. हे माझ्या आवडीचे गाणे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, मला असे वाटते की आपल्याला जे आवडते ते केले तर आपण थकत नाही, असे सांगत त्यांनी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे उदाहरण दिले. आशाताई या वयातही 3 तास कार्यक्रम करू शकतात, तशा त्या 21 वर्षांच्या आहेत, कारान त्या गाणे जगतात. तसेच, आपल्याला आवडते ते काम करताना आम्ही देखील थकत नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या आवडीचे काम करण्याचा सल्ला देखील दिला आहे.