रायगड रॉयल्सची एलिमिनेटरमध्ये विजयी आघाडी: विकी ओस्तवालच्या ७४ धावांच्या खेळीने कोल्हापूर टस्कर्सचा पराभव; पुणेरी बाप्पाशी क्वालिफायर – Pune News


महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२५ स्पर्धेत एलिमिनेटर लढतीत विकी ओस्तवाल( ७४ धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचा ६ गडी राखून पराभव करत

.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत रायगड रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने २० षटकात ७बाद १६४धावा केल्या. सचिन धस २३धावांवर तंबूत परतला. पाठोपाठ विशांत मोरे(२)ला रायगडच्या तनय संघवीने झेल बाद केले. एकाबाजूने विकेट्सची गळती सुरु असताना अंकित बावणेने ५० चेंडूत ५७धावांची खेळी करून संघाचा डाव सावरला. त्यात त्याने २चौकार व २षटकार खेचले. अंकितने सिद्धार्थ म्हात्रेच्या समवेत तिसऱ्या विकेटसाठी ४५चेंडूत ४४ धावाची भागीदारी केली. सिद्धार्थ म्हात्रे २९चेंडूत २चौकर व १षटकारासह ३१धावा काढून बाद झाला. त्यानंतर आनंद ठेंगेने ६चेंडूत नाबाद २६धावांची आक्रमक खेळी केली. आनंदने २चौकार व ३षटकार मारत संघाला १६४धावांचे लक्ष्य उभारून दिले. रायगड रॉयल्सकडून निखिल कदम(३-३५), तनय संघवी(२-३३), शुभम कदम(१-१३) यांनी सुरेख गोलंदाजी केली.

१६४ धावांचे आव्हान रायगड रॉयल्स संघाने १९.४ षटकात ४ बाद १६५ धावा करून पूर्ण केले.

सामन्यात सिद्धेश वीर व विकी ओस्तवाल या सलामी जोडीने ५२चेंडूत ७६धावाची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. सिद्धेश वीर २९चेंडूत ७चौकाराच्या मदतीने ३९धावा काढून तंबूत परतला. कोल्हापूरच्या दिपक डांगीने सिद्धेशला त्रिफळा बाद करून संघाला पहिला धक्का दिला. सलामवीर विकी ओस्तवालने सुरेख खेळी करताना ३७ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. विकीने नीरज जोशीच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी ४७चेंडूत ६३ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ आणून ठेवले. विकी ओस्तवालने ५४चेंडूत ७४धावांची दमदार खेळी केली. त्याने ११चौकार व १ षटकार मारले. विकीला कोल्हापूरच्या आनंद ठेंगेने झेल बाद केले. नीरज जोशीने २७ चेंडूत नाबाद ३७ धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. नीरजने २चौकार व २षटकार उत्तुंग ठोकले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24