लोणावळ्यातील घरफोडीचा मुख्य आरोपी अटकेत: 50 पेक्षा जास्त घरफोड्यांचा आरोप, 30 लाखांचे दागिने जप्त – Pune News



पुणे ग्रामीण पोलिसांनी लोणावळा येथील एका घरफोडीच्या प्रकरणात मुख्य आरोपीसह चार जणांना अटक केली आहे. आरोपींकडून ३० लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

.

मुख्य आरोपी चंद्रकांत माने उर्फ चंदू याच्यासह धनंजय काळे, दीपक मेंदगे आणि कैलासचंद्र जाट यांना पोलिसांनी अटक केली. चंद्रकांत माने नुकताच चेन्नई येथील घरफोडीच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटला होता.

प्रकरणाची सुरुवात २५ मे रोजी झाली. एका ज्येष्ठ महिलेच्या लोणावळा येथील घरातून ४७ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन किलोग्रॅम चांदीची भांडी चोरीला गेली. चोरीचा एकूण मुद्देमाल २९ लाख २६ हजार रुपयांचा होता.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा मागोवा घेतला. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वडगाव मावळ येथे सापळा रचून मुख्य आरोपी आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्हा कबूल केला.

पुढील तपासात आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३४ तोळे ८ ग्रॅम सोने आणि २ किलो चांदी जप्त करण्यात आली. मुख्य आरोपी चंद्रकांत माने याच्याविरुद्ध आधीच ५० हून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.तो चोरी करताना नेहमी वेगवेगळे साथीदार सोबत ठेवायचा. त्याच्याविरुद्ध कर्नाटक, चेन्नई, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर हद्दीत गुन्हे दाखल आहेत. १५ ते २० दिवसांपूर्वीच चेन्नई येथील घरफोडीच्या गुन्ह्यातून तो जमीनावर बाहेर आला होता.

पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजेश रामाघरे, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, सहायक निरीक्षक राहूल लाड, उपनिरीक्षक रमेश भिसे, उपनिरीक्षक सुर्यकांत वाणी, पोलिस कर्मचारी राहुल पवार, सागर नामदास, धिरज जाधव, तुषार भोईटे, अमोल शेडगे, वैभव सावंत, समाधान नाईकनवरे, समीर तांगडे, उपनिरीक्षक मुकुंद कदम, अंमलदार संदिप मानकर, अविनाश जाधव, तुषार भोसले यांनी ही कामगिरी केली आहे.|



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24