पुणे मेट्रोचे खडकी मेट्रो स्थानक उद्या शनिवार, २१ जून २०२५ रोजी प्रवासी सेवेत दाखल होत आहे. खडकी मेट्रो स्थानक हे पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट या महत्त्वपूर्ण मार्गिकेवर स्थित आहे. हे स्थानक खडकी रेल्वे स्थानकाच्य
.
प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना अधिक सोयीस्कर आणि अखंड प्रवासाचा अनुभव घेता येईल. हे स्थानक सुरु झाल्यामुळे प्रवाशांना खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कँटोनमेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डिनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता अश्या महत्वाच्या ठिकाणी पोहोचणे सोयीस्कर होणार आहे.
या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हंटले आहे की, पुणे मेट्रोच्या विस्तारात खडकी स्थानकाची भर पडल्याने पुणे व पिंपरी चिंचवड या जुळ्या शहरांना जोडणाऱ्या या रस्त्यावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट झाली आहे. खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कँटोनमेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डिनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता ठिकाणी राहणाऱ्या व कामासाठी येणाऱ्या नागरिकांना या स्थानकाचा फायदा होणार आहे.
