दुचाकीस्वार दाम्पत्याची दुचाकी घसरुन अपघात झाल्यावर मदतीचा बहाण्याने तरुणाच्या गळ्यातील ७५ हजारांची सोनसाखळी लांबविल्याची घटना घडली.अनोळखी चोरटे दुचाकी चावी काढून पसार झाल्याची घटना कोंढव्यातील टिळेकरनगर भागात घडली आहे. याबाबत प्रसार झालेल्या आरोपींच
.
याबाबत एका तरुणााने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांची पत्नी रात्री दहाच्या सुमारास कोंढवा बुद्रुक भागात राहायला आहेत. ते कामानिमित्त बाहेर गेले होते. दुचाकीवरुन ते घरी निघाले होते. टिळेकरनगर येथील श्रीराम चौकात खड्ड्यात त्यांची दुचाकी घसरली. दोघेजण खाली पडले. तेव्हा त्यांना मदतीच्या बहाणा करून चोरटे तेथे आले. मदतीचा बहाणा करुन चोरट्यांनी तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात पुढील तपास करत आहेत.
पीएमपी प्रवासी महिलेची दागिने लंपास
पीएमपी प्रवासी महिलेच्या हातातील सोन्याची पाटली कटरने कापून लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कात्रज येथील पीएमपी बस स्थानकाकडून येवलेवाडीकडे निघाल्या होत्या. बसमध्ये गर्दी हाेती. चोरट्याने कटरने हातातील ७० हजारांची बांगडी कापून नेली. पोलीस उपनिरीक्षक एस खराडे तपास करत आहेत.