उद्धव ठाकरेंचा आगामी निवडणुकीसाठी प्लॅन तयार: मनसे युतीबाबत सकारात्मक, स्थानिक पातळीवर आढावा घेण्याच्या जिल्हाप्रमुखांना सूचना – Maharashtra News



राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा आणि संपर्क प्रमुखांची आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात बैठक झाली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आघाडी की मनसे सोबत युती केल्याने पक्षाचा फायदा होईल, याची स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा करुन येत्या एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

… स्वतंत्र लढण्यास तयार राहा

राज्यभरात स्थानिक पातळीवर युती, आघाडी करण्यासंदर्भात आढावा घ्यावा. जर युती, आघाडी झाली नाही तर सर्व जागांवर पक्ष म्हणून लढण्यास तयार राहण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. महिन्याभरात हा अहवाल जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख यांनी द्यायचा आहे.

युती आघाडी करण्याबाबत पक्ष निर्णय घेईल

आगामी काळात मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत. मात्र, स्थानिक पातळीवर युती, आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिल्या आहेत. स्थानिक पातळीवर कुठे आघाडी, युती करायची याबाबतचा निर्णय पक्ष घेईल. त्यामुळे महिन्याभरात हा अहवाल जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख यांनी देण्याच्या सूचना केल्या आहेत.

बोगस मतदार शोधण्याच्या सूचना

उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील संशयास्पद वाढीबाबत कार्यकर्त्यांना माहिती संकलनाचे आदेश दिले आहेत. मतदार याद्यांचा अभ्यास करा, लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत मतदार कसे वाढले? कुठे वाढले? बोगस मतदार शोधा? गटप्रमुखांनी 40 लाख मतदार कसे वाढले हे तपासा, मतदार याद्यांच्या घोळाबाबत माहिती समोर आणा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी केल्या आहेत.

हे ही वाचा…

मनसेसाठी सध्या हिंदीचा मुद्दा महत्त्वाचा:युतीत तूर्त रस नाही, संदीप देशपांडेंचे दबावाचे राजकारण; ठाकरे गटाच्या युतीच्या उत्साहावर सवाल

राजकीय वर्तुळात दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनीही पक्षाच्या वर्धापन दिनी आयोजित मेळाव्यात मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मकता दर्शवली. असे असतात मनसेने मात्र सध्या युतीपेक्षा हिंदी सक्तीविरोधी आंदोलनावर लक्ष केंद्रीत केले आहे. यासंदर्भात बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ”आम्ही सध्या हिंदी सक्तीच्या विरोधासाठी रस्त्यावर उतरलो आहोत, युतीमध्ये फारसा रस नाही,” असे स्पष्ट केले. त्याचबरोबर युतीचा विषय चर्चेत येत असतानाच, देशपांडे यांनी शिवसेनेच्या गतकालीन निर्णयांवरही जोरदार टीका केली आणि उद्धव ठाकरेंच्या उत्साहामागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पूर्ण बातमी वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *