शरद पवारांनी सांगितले वारंवार मुंबईतील रेल्वे अपघाताचे कारण: म्हणाले- खापर फोडून चालणार नाही; उपाय देखील सांगितले – Mumbai News



मुंबईतील मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. दोन लोकल गाड्या एकमेकां जवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले. मुंब्रा रेल्वे स्थानकावर आज सकाळी सुमारे 13 प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यापैकी

.

या संदर्भात शरद पवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून ही अत्यंत दुर्देवी घटना असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत जखमी साठी प्रार्थना देखील केली आहे. यात त्यांनी लोकल ट्रेन्स मधील वाढती गर्दी याचे मुख्य कारण असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने करायला हव्यात अशा उपाययोजना देखील सुचवल्या आहेत.

शरद पवार यांनी केलेली पोस्ट देखील पहा…

मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.

मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचं मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही.

केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24