यंदा दिवाळीपूर्वी मुंबईत सुमारे 5,000 घरांची मोठी लॉटरी काढली जाणार असल्याची घोषणा म्हाडाकडून करण्यात आली आहे.
म्हाडाने 2025-2026 च्या अर्थसंकल्पात ‘म्हाडा’च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत वर्षभरात राज्यात 19,497 घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात मुंबईमध्ये 5199 घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान आता दिवाळीपूर्वीच 5000 घरांची लॉटरी निघेल अशी माहिती संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS), कमी उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि उच्च उत्पन्न गट (HIG) यांना परवडणारी घरे मिळण्याची संधी मिळेल.
बीडीडी चाळ पुनर्विकासातील काही घरांचे वाटप मे महिन्यात केले जाणार असल्याची मोठी घोषणा यावेळी जयस्वाल यांनी केली. यामुळे बीडीडी चाळीतील पुनर्वसन नागरिकांनाही आता लवकरच घराच्या चाव्या मिळणार आहेत. मे 2025 मध्ये बीडीडी चाळीतील पुनर्वसन रहिवाशांना घरांच्या चाव्या दिल्या जातील. यामुळे या ऐतिहासिक प्रकल्पात महत्त्वाचा टप्पा गाठला जाईल.
हेही वाचा