वांद्रे (bandra) आणि माहीम (mahim) स्थानकांदरम्यान वेगावरील निर्बंधांमुळे बुधवारी 16 एप्रिल रोजी मुंबईच्या (mumbai) पश्चिम मार्गावरील लोकल सेवा उशिराने (delayed) सुरू होत्या. या निर्णयामुळे हजारो दैनंदिन प्रवाशांना फटका बसला आहे. त्यामुळे प्रवासात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत आणि ऑफिसमध्ये जाणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे.
मिठी नदी ओलांडणाऱ्या भागानजीक धावणाऱ्या लोकल गाड्या (local train) सध्या ताशी 20 -30 किलोमीटर वेगाने धावत आहेत. संथ गतीमुळे उपनगरीय गाड्या 15 मिनिटांपर्यंत उशिराने धावत आहेत. ज्यामुळे जलद आणि संथ लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांनी विलंब झाल्याची पुष्टी केली आणि गैरसोयीबद्दल माफी मागितली.
“यामुळे लोकांच्या दिनचर्येत गोंधळ निर्माण होत आहे. अंधेरी ते वांद्रे या वेगवान ट्रेनला 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत आहे. हा काय मूर्खपणा आहे? वेगवान ट्रेन धीम्यापेक्षाही हळू धावत आहे!” एका निराश प्रवाशाने सोशल मीडियावर लिहिले. दुसऱ्याने अधिकाऱ्यांना आवाहन केले की, “कृपया लवकरात लवकर परिस्थिती पूर्ववत करा.”
रेल्वेच्या या विलंबामुळे अनेक प्रवाशांना लेटमार्कला सामोरे जावे लागत आहे. ज्यामुळे प्रवाशांना शारिरीक आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हेही वाचा