मुंबई (mumbai) महापालिकेच्या (bmc) उद्यान विभागाने झाडांचे, विशेषतः रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांचे आरोग्य जपण्यासाठी ‘वृक्ष संजीवनी अभियान’ (vruksh sanjeevani abhiyaan) ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेअंतर्गत, अधिकारी झाडांच्या खोडांवर लावलेले खिळे, जाहिरात फलक, बॅनर, विजेच्या तारा आणि इतर वस्तू काढून टाकणार आहेत. तसेच कर्मचारी झाडांच्या मुळांभोवतीच्या परिसराचे देखील काँक्रिटीकरण करणार करून झाडांची वाढ वाढविण्यासाठी ते लाल मातीने भरणार आहेत.
ही मोहीम 15 एप्रिल रोजी सुरू झाली आहे. तसेच ही मोहिम 15 दिवसांची असणार आहे. 30 एप्रिलपर्यंत 24 पालिका वॉर्डांमध्ये ही मोहीम सुरू राहणार आहे.
मुंबईत सुमारे 29.75 लाख झाडे आहेत. तथापि, रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक झाडांवर (trees) नागरिक झाडांच्या खोडांवर वस्तू लटकवून, खिळे ठोकून, पोस्टर चिकटवून, वीज तारांनी खोड झाकून नुकसान करतात, ज्यामुळे पूर्ण वाढ झालेल्या निरोगी झाडांचे नुकसान होते.
पालिका उद्यान विभागाने हाती घेतलेली ही दुसरी मोहीम आहे. शेवटची मोहीम 2022 मध्ये हाती घेण्यात आली होती. जेव्हा झाडांच्या खोडांवरून 124 किलो वजनाचे खिळे काढण्यात आले होते. तसेच तब्बल 2243 पोस्टर्स काढण्यात आले होते.
उद्यान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 10449 झाडांवरील खिळे/पोस्टर आणि केबल्स काढण्यात आले आणि 1906 झाडांचे काँक्रिटीकरण करण्यात आले.
मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही मोहीम वॉर्ड पातळीवर सहाय्यक उद्यान अधीक्षकांकडून राबवली जात आहे. तसेच यात स्थानिक स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली जाईल.
जागरूकता कार्यक्रम आणि उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अलिकडेच केलेल्या कारवाईमुळे या वर्षीच्या मोहिमेत 2022 पेक्षा कमी उल्लंघने होतील अशी मुंबई महापालिकेला अपेक्षा आहे.
हेही वाचा