आता रेल्वेतही काढता येणार ATM मधून पैसे



आता रेल्वेतच एटीएम मशीनची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना आता रेल्वेतून प्रवास करताना देखील एटीएम मधून पैसे काढणे शक्य होणार आहे.

रेल्वेच्या प्रवासाला कधी एक किंवा दोन दिवसांहून अधिक दिवसही लागतात. प्रवासाला निघताना बऱ्याचदा पैसे घेण्याचा विसर पडत असतो. तर कधी कधी प्रवासाला निघताना घाईगडबडीत एटीएम मधून रक्कम काढणे शक्य होत नाही. परिणामी प्रवासादरम्यान पैशांची अडचण जाणवत असते. परंतु आता रेल्वेने प्रवाशांची ही अडचण दूर केली आहे. 

प्रवाशांना रेल्वेत एटीएम सुविधा मिळणार आहे. याचा व्हिडियो देखील व्हायरल होत आहे. मनमाड- मुंबई सीएसटी धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये ही सुविधा महाराष्ट्र बँकतर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. अनेक वेळेस प्रवाशांना पैशाची निकड भासत असते.

अशा परिस्थितीत रेल्वेतच प्रवाशांना एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा बँकेने उपलब्ध केली आहे. यामुळे प्रवाशांसाठी हि सुविधा सोयीची ठरणार आहे. 

दरम्यान एक्सप्रेसमध्ये एटीएमची ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. एका बोगीच्या रिकाम्या जागेमध्ये हे एटीएम उभारण्यात आले आहे. हे मशीन सुरक्षित राहण्यासाठी याला शटर देखील लावण्यात आले आहे. यामुळे रेल्वे प्रवासात ज्याला पैशांची गरज आहे, तो रक्कम काढू शकले. असे असले तरी एटीएम सुरक्षेचा प्रश्न मात्र येथे राहणार आहे.


हेही वाचा

एलफिस्टन ब्रिजचे काम पुन्हा पोस्टपाँड?


मुंबईतील टँकर चालकांचा संप मागे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

kmjs time slot