आयआयटी मुंबईत नवीन अभ्यासक्रमाला सुरूवात



सॉफ्टवेअर विकासक, डेटा वैज्ञानिक, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि अभियंते यांना संगणक प्रोग्रामिंग, संगणन प्रणाली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग यांसारख्या अत्याधुनिक विषयांचे अधिक सखोल ज्ञान मिळावे यासाठी नवीन निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईने (mumbai) (आयआयटी मुंबई) ‘ई-पदव्युत्तर डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग’ हा नवा अभ्यासक्रम सुरू केला आहे. जून 2025 पासून या अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू होणार असून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी हा अभ्यासक्रम विकसित केला आहे. व्यावसायिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील इच्छुकांना उच्च दर्जाचे संगणक शास्त्र शिकण्यासाठी तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचे सखोल ज्ञान मिळण्यासाठी ई-पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

भारतीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर डिजिटल तंत्रज्ञानाला चालना देण्याच्या दृष्टीने आणि भारतातील (india) तंत्रज्ञान क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यास हा अभ्यासक्रम सहाय्यक ठरेल, असे आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी सांगितले.

ऑनलाईन माध्यमातून शिकवला जाणारा हा अभ्यासक्रम प्रामुख्याने सॉफ्टवेअर विकासक, डेटा वैज्ञानिक, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ, अभियंते आणि तांत्रिक कौशल्य असलेल्या पदवीधरांसाठी उपयुक्त ठरणार आहे. हा अभ्यासक्रम दर्जेदार ऑन-कॅम्पस अभ्यासक्रमाच्या समकक्ष असणार आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाइन थेट व्याख्याने, संवादात्मक सत्रे, प्रायोगिक प्रकल्प आणि आभासी प्रयोगशाळांच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबईच्या (iit bombay) पदवी प्रदान समारंभामध्ये त्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

ई-पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी (PG Diploma) आयआयटी मुंबईने ‘ग्रेट लर्निंग’ या नामांकित कंपनीशी भागीदारी करार केला असल्याचेही प्राध्यापक शिरीष केदारे यांनी सांगितले.

संगणक शास्त्र आता केवळ कोडिंग किंवा ॲप विकसित करण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. डेटा व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि क्लाऊड संगणन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मागणी झपाट्याने वाढत आहे.

या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये मिळविण्याची आणि आपले करिअर पुढे नेण्याची संधी मिळणार असल्याचे ग्रेट लर्निंगचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन लखमराजू यांनी सांगितले.

ई-पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी अर्जदाराकडे बीई, बी-टेक किंवा चार वर्षांची बीएस पदवी असणे आवश्यक आहे. संगणक शास्त्र किंवा संबंधित क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24