मासेमारी बोट पाणबुडीला धडकली, दोन खलाशांचा मृत्यू



अरबी समुद्रात एक मच्छिमार बोट पाण्यात उलटली असून यात दोन खलाशांचा (fisherman) मृत्यू झाला आहे. या अपघातात नौदलाच्या पाणबुडीचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. या मासेमारी नौकेचे मालक तांडेल यांच्यावर मुंबईतील (mumbai) यलोगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दोन्ही मृत खलाशांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसेच मृतदेहांची ओळख पटवली जात आहे.

कर्नाटकातील कारवार बंदरातून भारतीय नौदलाची (indian navy) पाणबुडी आयएनएस कारंजा 21 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.15 वाजता पेरिस्कोपची खोली राखून दक्षिण पूर्वेला (154 अंश) गोवा राज्याच्या किनारपट्टीपासून 6 नॉटिकल मैल वेगाने पुढे जात होती.

दरम्यान, पाणबुडीच्या उजव्या बाजूला एक मासेमारी बोट दोन ते तीन किमी अंतरावर होती.

भारतीय नौदलाचे कार्यकारी अधिकारी कमल प्रीत सिंग यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मासेमारी जहाज F V मार्थोमा पाणबुडीच्या यंत्रणेवर दिसत होते. त्यावेळी मासेमारी बोट F V मार्थोमाने अचानक वेग घेतला आणि आमच्या पाणबुडीजवळ येऊ लागली.

वॉच ऑफिसरने बोटीपासून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी पाणबुडीचा वेग वाढवला आणि मार्ग बदलला. पण F V मार्थोमाने वेग वाढवला आणि पाणबुडीला धडक (collision) दिली.

बुडालेल्या बोटीतून खलाशांना वाचवण्यासाठी पाणबुडीच्या अधिकाऱ्यांनी बचाव मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान बुडालेल्या एफव्ही मार्थोमा बोटीतील दोन खलाशांचे मृतदेह सापडले. हे मृतदेह यलो गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

नौदलाचे कार्यकारी अधिकारी कमल प्रीत सिंग यांनी तक्रारीत म्हटले आहे की, नौदलाच्या पाणबुडीचे 10 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24