दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांकात बदल



मुंबईतील वाहतुकीच्या दृष्टीने दादर (dadar) स्थानक अत्यंत महत्त्वाचे आहे. मुंबईतील (mumbai) महत्त्वाच्या मध्य आणि पश्चिम मार्गाला जोडणारे दादर स्थानक अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे. तसेच दादर स्थानकातून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात.

यामुळे दादर स्थानकात उपनगरीय सेवेने (mumbai local) प्रवास करणारे तसेच लांब पल्ल्याच्या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला गर्दीचे व्यवस्थापन करणे अशक्य होते. 

याच गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. असाच एक महत्त्वाचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांकात (platform no.) बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 27 नोव्हेंबर 2024 पासून हा बदल करण्यात येणार आहे.

मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांनी मंगळवारी संध्याकाळी ट्विटरवर ही घोषणा केली.

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 मध्ये बदल करून प्लॅटफॉर्म क्रमांक 9A आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 10A करण्यात येणार आहे

यामुळे उपनगरीय रेल्वेसेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या व्यवस्थापनास सोईचे आणि प्रभावी ठरेल. तसेच यातील प्लॅटफॉर्म क्रमांक 9A केवळ उपनगरीय गाड्यांसाठी तर प्लॅटफॉर्म क्रमांक 10A लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वापरला जाईल. या वर्गीकरणामुळे प्रवाशांचा गोंधळ कमी होऊन गर्दीच्या वेळेस गाड्यांच्या व्यवस्थापनास मदत होणार आहे, असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

दादर स्थानकात फलाट क्रमांक बदलण्याची ही पहिलीच वेळ नसून याआधीही फलाट क्रमांकामध्ये बदल करण्यात आला आहे. 


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24