‘बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घ्या’ : संजय राऊत



राज्यात (maharashtra) सरकार स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. महायुतीमधील भाजपा (bjp), शिवसेना (एकनाथ शिंदे) (shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) (ncp) या तीन पक्षांना एक्झिट पोल्समध्ये (exit polls) मविआपेक्षा अधिक जागा दाखविल्या गेल्या होत्या. 

आता संजय राऊत (sanjay raut) यांनी या निकालावर संशय व्यक्त केला आहे. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष इतक्या जागांवर आघाडी घेऊ शकत नाही. तसेच खुद्द भाजपा पक्षाने एकनाथ शिंदेंच्या पक्षाबाबत जेमतेम 20 जागांचा अनुमान लावला होता. 

हा जनतेचा निकाल नसून यात फेरबदल केला जात आहे. जनतेच्या मनातला कौल आम्ही जाणतो. हा निकाल आम्हाला मान्य नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे.

सध्या जे कल येत आहेत, त्यावर महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलं आहे की, “Ballet Paper (मत पत्रिका) वर पुन्हा निवडणुका घ्या. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही. नाही! नाही! त्रिवार नाही! असा निकाल लागूच शकत नाही.”

तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस (congress), शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांना महायुतीपेक्षा थोड्या कमी जागा दाखविल्या गेल्या. अपक्ष, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचीही कामगिरी कशी असेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मात्र आज सकाळी सुरू झालेल्या मतमोजणी फेऱ्यांमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. बहुमतापेक्षाही अधिकचा पल्ला महायुतीने गाठला आहे. भाजपाने 2019 पेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी पिछाडीवर आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंच्या शिवसेनेहून दुप्पट आणि त्याहून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तसेच अजित पवारांची राष्ट्रवादीनेही शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षापेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल येत असताना आता भाजपाप्रणीत महायुतीने मोठी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. भाजपाने 111 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली असून महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. 


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24