लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार?



मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोट्यावधी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे लाभ घेतला आहे. 1500 रुपये या प्रमाणे तीन महिन्यांचे मनाधन तसेच 3 हजार रुपयांचा दिवाळी बोनस देखील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे.

अनेक महिला या योजनेचा लाभ मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. अशातच आता महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार? याबाबत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे. 

लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाल्या मंत्री अदिती तटकरे 

लाडकी बहीण योजनेबाबत अनेक समज गैरसमज निर्माण झाले आहेत. अशातच  मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत खुलासा केला आहे.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत.

शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे.  

सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती ! अशी पोस्ट मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे. 

लाडकी बहीण योजना ही कायमस्वरुपी सुरू राहणारी योजना आहे. योजनेला महिलांचा प्रतिसाद बघून विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी केला आहे. 


हेही वाचा

निवडणुकीनंतर लाडकी बहिण योजनेची रक्कम वाढेल : अजित पवार


विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन कसा मिळतो? : राज ठाकरे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24