नवी मुंबई : आचारसंहितेनंतर नवी मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्ज हटवले



महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आचारसंहिता लागू झाली आहे. या अनुषंगाने नवी मुंबई (navi mumbai) महानगरपालिका (nmmc) क्षेत्रातील विविध माध्यमांद्वारे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित होणाऱ्या अनधिकृत जाहिराती हटवण्याची कारवाई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.

यामध्ये 13 ते 16 ऑक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात 4418 लहान-मोठे अनधिकृत (illegal) बॅनर व होर्डिंग (hoardings) हटविण्यात आले आहेत.

महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या सूचनेनुसार व अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ.राहुल गेठे यांच्या देखरेखीखाली कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पालिका आयुक्त आणि विभाग अधिकाऱ्यांसह सहा विभागांनी सरकारी, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांवर लावलेल्या अनधिकृत राजकीय जाहिराती हटवल्या आहेत.

त्यामध्ये बेलापूर विभागात 391, नेरूळ विभागात 1139, वाशी विभागात 444, तुर्भे विभागात 1005, कोपरखैरणे विभागात 571, घणसोली विभागात 350, ऐरोली विभागात 331, दिघा विभागात 187 बॅनरचा आणि होर्डिंगचा समावेश आहे. बॅनर आणि होर्डिंग्स काढण्यात आले आहेत. याशिवाय सार्वजनिक भिंतींवरील चित्रे, लेखन, पोस्टर, झेंडे हटविण्यात आले आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने अनधिकृत राजकीय जाहिराती हटविण्याची कारवाई केली आहे. भविष्यात निवडणूक विभागाची परवानगी घेऊनच मान्यताप्राप्त नमुन्यात जाहिराती प्रसिद्ध कराव्यात अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24