महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल



शिवसेना यूबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रकृती अचानक बिघडली. सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून रिलायन्स रुग्णालयात तपासणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर हृदयात ब्लॉकेज आहेत की नाही याची तपासणी केली जाईल.

शिवसेना यूबीटी प्रमुखांची दसरा मेळाव्यापासून प्रकृती ठीक नसल्याची बातमी उद्धव ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. यानंतर ते तपासणीसाठी रुग्णालयात पोहोचले.

यापूर्वी 2016 मध्ये ठाकरे यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली होती. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यावेळी त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यावेळी 8 स्टेंट टाकले होते.

2021 साली मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी उद्धव ठाकरे एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर 12 नोव्हेंबर 2021 रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. तासभर उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती.

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आठवड्याभराने उद्धव ठाकरेंची फिजिओथेरेपी सुरू करण्यात आली होती. याच शस्त्रक्रीयेदरम्यान उद्धव ठाकरेंनी अनेक बैठका तसेच काही वेळेस जनतेशी मानेला आजरपणामुळे आलेला पट्टा लावून संवाद साधला होता.

उद्धव ठाकरेंचं हे आजरपण शिवसेनेतील बंडानंतरही राजकीय आरोप प्रत्यारोपांचा विषय ठरलं होतं. उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षातील अनेक नेत्यांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं.




Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24