मेट्रो 2A आणि मेट्रो 7 तिकिटे आता व्हॉट्सॲपवर उपलब्ध



‘दहिसर पश्चिम – अंधेरी पश्चिम मेट्रो 2A’ आणि ‘दहिसर पूर्व – गुंडवली मेट्रो 7’ मार्गांवरील प्रवास अधिक सोईस्कर होणार आहे. मुंबई (mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (mmrda) आणि मुंबई मेट्रो (METRO) मूव्हमेंट कॉर्पोरेशन (MMMOCL) यासाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. 

आता प्रवासी व्हॉट्सॲपद्वारे तिकीट काढू शकतात. शुक्रवारी ‘मेट्रो 7’ मार्गावरील गुंडवली मेट्रो स्थानकावर महिला प्रवाशांसाठी मेट्रोचे तिकीट व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्याची सेवा सुरू करण्यात आली.

मेट्रो प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी ‘MMMOCL’ ने अनेक तिकीट पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. MMMOCL च्या ॲपवरून तिकिटे खरेदी करता येतील.

‘MMMOCL’ ने आता व्हॉट्सॲप तिकिटांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जेणेकरून प्रवाशांना सहजरित्या मेट्रोचे तिकीट मिळू शकेल. प्रवाशांसाठी ही सुविधा शुक्रवारपासून सुरू करण्यात आली.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी, प्रवासी संभाषणात्मक इंटरफेसद्वारे व्हॉट्सॲप क्रमांक 8652635500 वर ‘हाय’ पाठवून किंवा स्थानकांवर क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट खरेदी करू शकतात. यासाठी तिकिटाची रक्कम डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे भरता येईल. या सेवेमुळे तिकिटे लवकर मिळतील, असा दावा MMMOCL ने केला आहे.

दरम्यान, ‘मेट्रो 2A’ आणि ‘मेट्रो 7’ मार्गावरील प्रवाशांचा ई-तिकीट वापरण्याकडे अधिक कल दिसून येत आहे. या दोन मार्गांवरून प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी 62 टक्के प्रवासी ई-तिकीट वापरतात. तर त्यातील तीन टक्के प्रवासी मोबाईल क्यूआर कोडद्वारे तिकिटे खरेदी करतात.

त्याचवेळी एनसीएमसी कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांची संख्या 35 टक्के आहे.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24