टाटा ट्रस्टला मिळाले नवे चेअरमन!



उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर आता टाटा ट्रस्टची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे.

रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची आता टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रतन टाटांच्या निधनानंतर मुंबईत टाटा समुहाची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सर्व वरिष्ठ अधिकारी व विश्वस्तांच्या सहमतीने रतन टाटांचे भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे नवे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टाटा समुहाच्या दोन सर्वात मोठ्या धर्मादाय संस्था सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्या प्रमुखपदी आता नोएल टाटांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नोएल टाटा हे याआधी या दोन्ही संस्थांचे विश्वस्त म्हणून कार्यरत होते. आता ते या संस्थांचा कारभार पाहतील.

आधी रतन टाटा हे काम पाहत होते. स्वतः रतन टाटा यांनी या संस्था उभारण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. टाटा समुहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टची मोठी भागिदारी आहे.

टाटा ट्रस्टकडे टाटा सन्सची तब्बल ६६ टक्के भागिदारी आहे. टाटा समूह टाटा ट्रस्टद्वारे चालवला जातो. टाटा ट्रस्ट धर्मादाय उपक्रम आणि प्रशासनावर देखरेख ठेवण्याचं काम पाहते.


हेही वाचा

रतन टाटांना उतरत्या वयात साथ देणारा शंतनू नायडू कोण?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24