बेस्ट बसच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा मृत्यू



खेरगाव, वांद्रे (पूर्व) (bandra) येथे बेस्ट बसने (best bus) शाळकरी मुलाला धडक दिली. मंगळवारी मुलगा शाळेतून घरी परतत असताना हा अपघात (accident) घडला. या अपघातात 12 वर्षीय शाळकरी मुलाचा (boy) मृत्यू झाला.

सकाळी 10.30 च्या सुमारास अरबाज शाळेतील इतर विद्यार्थ्यांसोबत घरी परतत असताना ही घटना घडली. अरबाज खेरवाडी पोलीस ठाण्याजवळील शासकीय वसाहत इमारतीजवळ आला होता.

त्यावेळेस भरधाव वेगात असलेल्या बेस्ट बसने (best) या मुलाला डाव्या बाजूला धडक दिली. मुलगा जमिनीवर पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. बस कंडक्टरने ताबडतोब मुलाला ऑटो रिक्षामधून व्ही.एन.देसाई रुग्णालयात नेले जेथे उपचारादरम्यान दुपारी 12.15 वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले.

ही बस वांद्रे रेक्लेमेशन डेपोतून वांद्रे (पूर्व) येथील टाटा कॉलनीकडे जात होती. अरबाजची ओळख त्याच्या शाळेच्या ओळखपत्रावरून झाली आणि त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी त्याच्या वडिलांचे जबाब नोंदवले आणि बस चालक विजय बागल याच्याविरुद्ध बीएनएस कलम 106 (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि 281 (रॅश ड्रायव्हिंग) नुसार गुन्हा दाखल केला. अखेर बस चालकाला अटक करण्यात आली.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24