17 ऑक्टोबरला मुंबई विमानतळ 6 तासांसाठी बंद



जगातील सर्वात व्यस्त सिंगल-रनवे विमानतळांपैकी एक म्हणून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची (CSMIA) ओळख आहे.

पावसाळ्यानंतर धावपट्टीचे काम करण्यासाठी मुंबई (mumbai) विमानताळ (mumbai airport) 17 ऑक्टोबर 2024 रोजी बंद राहणार आहे. मुंबई विमानतळावरील क्रॉस रनवे – RWY 09/27 आणि RWY 14/32 हे सकाळी 11:00 ते पहाटे 5 पर्यंत तात्पुरते बंद असेल. या संदर्भात सहा महिन्यांपुर्वी नोटीस टू एअरमेन (NOTAM) देखील जाहीर करण्यात आली होती.

यामुळे विमानतळाच्या पायाभूत सुविधांची आवश्यक दुरुस्ती आणि देखभालीची कामे पार पडणार आहेत. पावसाळ्यानंतर धावपट्टीच्या (runway) देखभालीची कामे दरवर्षी केली जातात. या देखभालीच्या उपक्रमांचा मुळ उद्देश एअरसाइड ऑपरेशन्ससाठी सुरक्षेला प्राधान्य देणे आहे.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24