MMRCL मेट्रोसाठी इंटरनेट नेटवर्क कनेक्टिव्हिटी प्रदान करणार



मुंबई (mumbai) मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (mmrcl) प्रवाशांसाठी आरे जेवीएलआर ते बीकेसी स्थानकापर्यंत मेट्रो लाईन-3 (metro line 3) प्रवास आरामदायी करणार आहे. यासाठी एमएमआरसीएल इंटरनेट नेटवर्क कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे. 

प्रवासी मोबाईल ऍप्लिकेशन, तिकीट काउंटर, तिकीट वेंडिंग मशीन आणि एमएमआरसीएलच्या वेबसाइटवरून सिंगल आणि रिटर्न प्रवासाची तिकिटे खरेदी करू शकतात. हे तिकीट येण्या-जाण्याच्या प्रवासात 3 तासांसाठी वैध राहतील.

तसेच स्थानकांमध्ये प्रवासी त्यांचे तिकीट कोणत्याही अडचणीशिवाय बुक करण्यासाठी मोबाईल आणि वायफाय नेटवर्क वापरू शकतात. यामुळे प्रवाशांना सहज आणि सोईनुसार तिकिट उपलब्ध होणार आहे. 

तसेच एमएमआरसी लवकरच त्यांच्या सर्व स्थानकांवर आणि मेट्रोच्या आत 4G आणि 5G मोबाइल नेटवर्क कनेक्टिव्हिटी (internet connctivity) सुरू करणार आहे. यामुळे प्रवाशांना मेट्रोच्या आतही चांगल्या इंटरनेट कनेक्टिव्हीटीसह प्रवास करता येणार आहे.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24