डेमू ट्रेन आता पुण्यापर्यंत धावणार



दौंड ते पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. दौंड ते हडपसरपर्यंत धावणारी डेमू ट्रेन आता पुण्यापर्यंत धावणार आहे. डेमू ट्रेन हडपसरपर्यंतच धावत असल्याने हजारो विद्यार्थी, चाकरमानी, कर्मचारी व महिलांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत होते.

डेमू ट्रेन हडपसर ऐवजी पुणे स्टेशनपर्यंत नेण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी होती. अखेर रेल्वेने प्रवाशांची ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे दौंड – हडपसर ही डेमू ट्रेन आता पुणे रेल्वे स्थानकापंर्यत धावणार आहे, अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.

दौंड स्थानकावरून सकाळी 6:10 वाजता सुटणारी 01522 डिझेल (DMU LOCAL) रेल्वे हडपसर (मुंढवा) पर्यंतच असल्याने हजारो विद्यार्थी, चाकरमानी, कर्मचारी व महिलांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. ही डेमू हडपसर ऐवजी पुणे स्टेशन पर्यंत नेण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी होती. आता 01522 रेल्वे ही गाडी दौंड स्टेशन वरून सकाळी 6:05 वाजता सुटेल.

याबाबत  रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांचेच्या दिल्ली येथे भेट घेऊन तसेच तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांनी दौंड रेल्वे स्टेशन येथे भेट दिली त्यावेळी केली होती, तसेच आपण याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. 01522 – दौंड – हडपसर डेमू पुण्यापर्यंत नेण्याची मागणी केली होती.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांचेकडे दिल्ली येथे भेट घेऊन तसेच तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांचे दौंड पुणे रेल्वे प्रवासी संघाच्यावतीने तसेच प्रवाशांच्यावतीने आभार मानतो.

तसेच दौंड रेल्वे स्टेशनचा समावेश पुणे रेल्वे विभागात करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल देखील  रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव, तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांचे आभार.




Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24