मुंबई, ठाण्यातील वाहतूककोंडी फुटणार!



वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, भुयारी मार्ग उभारण्यावर राज्य सरकारने जोर दिला आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग, ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग आणि ठाणे वर्तुळाकार रेल्वे मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कामाला गती देण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह 1,354 कोटी, ठाणे-बोरिवली भुयारी मार्गासाठी 18 हजार कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

मुंबईसह ठाणे जिल्ह्याला वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. ही कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते आणि मेट्रो मार्गाचे जाळे विणले जात आहे.

मुंबईत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह असा भुयारी मार्ग तयार केला जात असून या कामाला गती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

एमएमआरडीएला यासाठी बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य दिले जाणार आहे. हा प्रकल्प 9 हजार 158 कोटी रुपयांचा असणार आहे. राज्य शासनाच्या करासाठी 614 कोटी 44 लाख रुपये, केंद्राच्या कराच्या 50 टक्के रकमेसाठी 307 कोटी 22 लाख रुपये, भूसंपादनासाठी 433 कोटी असे एकूण 1 हजार 354 कोटी 66 लाख रुपये एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज म्हणून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पास गती

ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती दिली असून त्यासाठी आवश्यक 12 हजार 220 कोटी 10 लाख रुपयांच्या सुधारित आराखड्यास मंत्रिमंडळाने मान्यता देण्यात आली. या मेट्रो रेल्वे मार्गाची लांबी 29 किलो मीटर असून 20 उन्नत स्थानके व दोन भूमिगत स्थानके असणार आहेत.

ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह

ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देण्यात येणार असून, यासाठी एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग : 18 हजार 800 कोटींचा प्रकल्प

ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गासाठी 18 हजार 800 कोटी 40 लाख रुपयांच्या प्रकल्पास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. सहापदरी मार्गाच्या दुहेरी-भुयारी मार्गाचे बांधकाम प्रति पदरी भुयारी मार्गाची एकूण 11.85 किमी अशी असणार आहे. एकूण 18 हजार 838 कोटी 40 लाख अशा किमतीच्या प्रकल्पाची एमएमआरडीएमार्फत अंमलबजावणी केली जाणार आहे.




Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24