शुक्रवारी मुंबईतील ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद



मुंबईमधील करी रोड आणि आसपासच्या भागात 27 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळेच पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेने केलं आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा, असं महापालिकेने म्हटलं आहे.

का बंद राहणार पाणीपुरवठा?

महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागातील सेनापती बापट मार्गावरील 1450 मिलीमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतलं जाणार आहे. येत्या 26 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजल्यापासून 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 19 तासांसाठी दुरुस्ती काम केले जाणार आहे. त्यामुळे जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही भागांतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

तर काही भागांमध्ये पाणीपुरवठा अंशत: बंद राहणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. तसेच, पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या भागात पाणीपुरवठा बंद राहणार

जी उत्तर –

सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग (दुपारी चार ते सायंकाळी सात दरम्यान 33 टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे.)

जी दक्षिण –

करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, लोअर परळ, डिलाईल मार्ग, बी. डी. डी. चाळ (पहाटे साडेचार ते सकाळी पावणेआठ या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील) एन. एम. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ (दुपारी अडीच ते तीन दरम्यान पाणीपुरवठा बंद) संपूर्ण प्रभादेवी, आदर्श नगर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, मराठे मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, गणपतराव कदम मार्ग (दुपारी चार ते सायंकाळी सात दरम्यान 33 टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे.)


हेही वाचा

वारसा जपणारे 300 वर्ष जुने वांद्रेतील गाव


सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड फ्लायओव्हरचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24